श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

मान्यवरांचे अभिप्राय


‘‘श्रमिक प्रतिष्ठान आता एका अर्थाने ‘श्रमिक मुक्त विद्यापीठ’ झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोल्हापूर शहरात पर्यायाने साऱ्या महाराष्ट्रात हे प्रतिष्ठान लोकशिक्षणाचे काम करीत आहे. या व्याख्यानमालेला श्रोत्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. या व्याख्यानमालेचे मला जे वैशिष्ट्य जाणवले ते असे की, दरवर्षी एखादा विषय निवडून त्याच विषयावर सलग आठवडाभर व्याख्याने घडवून आणली जातात. ही व्याख्याने पुस्तकरूपात प्रसिद्धदेखील केली जातात आणि या पद्धतीने ते विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे प्रतिष्ठान करीत आहे. अतिशय अभिनंदनीय अशा स्वरूपाची ही बाब आहे. म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
- डॉ. जनार्दन वाघमारे

‘‘श्रमिक प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने समाजातील महत्वाच्या प्रश्नावर ठोस उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.’’
- प्रा. एन. डी. पाटील

‘‘कोल्हापूर शहरात सलग आठ दिवस श्रोत्यांना एकत्रित आणून गंभीर विषयावर चर्चा करावयास लावणे ही आजच्या टीव्ही सिरिअल्सच्या काळात अशक्य ठरणारी बाब श्रमिक प्रतिष्ठानने शक्य केली आहे.’’
- राम पुनियानी

‘‘श्रमिक प्रतिष्ठानने ‘धर्म’ या गंभीर विषयावर विविध अंगाने जाहीररित्या विचार करण्यास भाग पाडणे ही अभिनंदनीय व दुर्मिळ बाब आहे.’’
- डॉ. रावसाहेब कसबे

‘‘देशीवादावर महाराष्ट्रात सर्वप्रथम कोल्हापूर शहरात व्याख्यान आयोजित करणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात श्रोत्यांनी उपस्थित राहणे ही अलीकडे न दिसणारी घटना कोल्हापुरात दिसून आली.’’
- डॉ. भालचंद्र नेमाडे

‘‘श्रमिक प्रतिष्ठानची प्रेरणादायी व्याख्यानमाला…’’
- श्री. गुलाबराव आवाडे, एक श्रोता

‘‘व्याख्यान ऐकू इच्छिणारा श्रोतृवर्ग १८ ते ४० वयोगटातील होता. रिकाम्या खुर्च्या सोडून गर्दीच्या ठिकाणचा फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरला कसरत करावी लागली नाही इतकी गर्दी होती.’’
- दैनिक सकाळ, कोल्हापूर