श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष ७ वे सन २००८)
नव्या जागतिकीकरणानंतरचे जग व भारत

नव्या जागतिकीकरणानंतरचे जग व भारत यांचा सर्वकष आढावा घेण्याच्या दृष्टीने या वेगळ्या विषयावरची व्याख्यानमाला श्रमिक प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आली. यामध्ये ‘राजकीय शक्ती संतुलनातील बदल व भारत’, ‘जागतिकीकरण व वित्तीय भांडवल’, ‘प्रसारमाध्यमांची सत्ता व भूमिका’, ‘संस्कृतीचे सपाटीकरण’, ‘माहिती तंत्रज्ञान – विकास की शोषणासाठी?’, ‘जनआंदोलने व एनजीओ’ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

ग्रंथाचे नाव : नव्या जागतिकीकरणानंतरचे जग व भारत
संपादक : प्रा. विलास रणसुभे
प्रकाशक : श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
मूल्य : रूपये १०० फक्त

------------------------ ----------------------------------------------


जगातील राजकीय शक्तीच्या संतुलनातील बदल व भारत : अशोक राजवाडे

अशोक राजवाडे यांनी आपल्या व्याख्यानात नव्या जागतिकीकरणामुळे जागतिक राजकयी सत्तेचे संतुलन कसे झाले?, या बदलाची सुरवात युरोपात कोणत्या राष्ट्रात सुरू आहे, लॅटिन अमेरिकेतील जागतिकीकरणातील सत्ता संतुलन आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडली.

जागतिकीकरण व वित्तीय भांडवल : प्रभात पटनायक

आंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाचे राज्यसंस्थेवरील वर्चस्व या विषयाची मांडणी ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ प्रभात पटनायक यांनी केली. नफा असलेल्या देशांकडेच आंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवल वळते. परिणामी, नफा नसलेल्या देशांत अरिष्टांची वादळे येतात. यातूनच अस्थिरता निर्माण होते. यात शेतकरी, कामगारांची परिस्थिती बिकट होते. अशा नवसाम्राज्यवादाशी लढण्यासाठी सर्व शक्ती एकवटली पाहिजे. आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचे स्वरूप बदलले पाहिजे. भांडवलाला कोणत्याही देशाच्या सीमा राहिलेल्या नाहीत, कोणत्याही देशाच्या नियमांची बंधने नको आहोत. पंतप्रधान, अर्थमंत्री कोण यावरच गुंतवणूक अवलंबून आहे.

प्रसारमाध्यमांची सत्ता व भूमिका : जयदेव डोळे

माध्यमांवर मूठभर लोकांची पकड असून, माध्यमांना हाताशी धरून समाजाला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. सामान्यांच्या प्रश्नांना प्रसारमाध्यमांतून बगल दिली जाते. नव्या जागतिकीकरणानंतर प्रसारमाध्यमे व्यक्तीला अराजकीय बनवीत आहेत. तसे होणे कार्पोरेट राजकारणाला आवश्य आहे. गुन्हे, मनोंरजन, सेक्स व रोमान्सकडे लक्ष वेधून समाजात खदखदणाऱ्या असंतोषाकडे दुर्लक्ष करण्यासाठी माध्यमे हातभार लावतात. एवढेच नव्हे, तर आजची प्रसारमाध्यमे परकीय भांडवलाला व्यवस्थित पुढे ढकलणारी इंजिने होऊन बसली आहेत.

संस्कृतीचे सपाटीकरण : गो. पु. देशपांडे

नव जागतिकीकरणात नवी औद्योगिक सत्ता उदयास येत असताना, उत्पादन व्यवस्थेची परिभाषा बदलत आहे. व्यवस्थेच्या भाषेमुळे संस्कीतची भाषाही बदलली आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांचे एक विवर आणि भारतातील अभिजन वर्गाचे एक विवर अशी ही दोन विवरे सांस्कृतिक सपाटीकरणाचे काम करत आहेत. पण त्याबाबत लोकांमध्य जागृतीच नसल्याने संस्कृतीवर घाला घातला जात आहे. संस्कृतीचे सर्व अर्थ समजून न घेतल्यानेच संस्कृतीवर अरिष्ट कोसळले आहे. संदर्भहीन पिढी तयार होत असून, त्यातू अराजकीय जगाची निर्मिती होण्याचा धोका आहे.


माहिती तंत्रज्ञान – मानवाच्या विकासासाठी की शोषणासाठी? : जितेंद्र शहा

संगणकाच्या क्षमतेचा वापर करण्याची मानसिकता शासकीय पातळीवर निर्माण केल्याशिवाय त्याचा सामान्य जनतेला उपयोग होणार नाही. आयटी प्रकल्प येण्यासाठी विजेची उपलब्धता असणे ही पहिली अट आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही श्रमिक आहेत, याची जाणीव ठेऊन त्यांनी समाजाशी आपली नाळ जोडावी. त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोषणव्यवस्थेला छेद देता येईल.