श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे व्याख्यानमाला (वर्ष ३ रे सन २००४) दि. १ ते ८ नोव्हेंबर, २००४
शिक्षण

जागतिकीकरणामुळे शिक्षण हा विषय मूठभर लोकांचा व गुंतागुंतीचा झालेला आहे. शिक्षण हा विषय शिक्षक व विद्यार्थी यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पालक, समाज व अर्थव्यवस्थेशी निगडीत बनलेला आहे. आज तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मानवी जीवनाचे सर्व प्रश्न सोडवू शकते, मानव्यशास्त्राची गरज नाही असे मत मांडले जात आहे. तंत्रशिक्षणामुळे मानवाची भौतिक प्रगती होऊ शकते. परंतु मानवाच्या सामाजिक जाणीवांची, मनाची, वर्तनाची, नीतीमत्तेची प्रगती होत नाही. त्यासाठी कला, क्रीडा, सामाजिक शास्त्राच्या शिक्षणाची गरज असते. या गोष्टीकडे भांडवली व्यवस्था दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच आजची शिक्षण व्यवस्था, त्याची सद्यस्थिती, जागतिकीकरणाचे त्याच्यावर झालेले परिणाम आदी विषयांची चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने शिक्षण या विषयावर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.

ग्रंथाचे नाव : शिक्षण
संपादक : प्रा. विलास रणसुभे
प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई
मूल्य : रूपये २०० फक्त

------------------------ ----------------------------------------------


शिक्षणव्यवस्थेची सद्यस्थिती : प्रा. एन. डी. पाटील

शिक्षणव्यवस्थेवर विचार मांडताना प्राचीन शिक्षण किंवा ब्रिटीशकालीन शिक्षणव्यवस्था याचा विचार न करता शिक्षणव्यवस्थेची सद्यस्थिती कोणती आहे, या संबंधीच्या विचारांची सविस्तर मांडणी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. एन. डी. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात केली.

शिक्षण, शासन व राज्यघटना : डॉ. सत्यरंजन साठे

डॉ. साठे यांनी आपल्या व्याख्यानातून शिक्षण, शासन व राज्यघटना या विषयावर घटनेतील तरतुदींचा योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.

शिक्षण व ढासळती मूल्यव्यवस्था : प्रा. अरविंद रेडकर

शिक्षण व ढासळती मूल्यव्यवस्था : प्रा. अरविंद रेडकर

दलित व वंचितांचे शिक्षण : लक्ष्मण माने

लक्ष्मण माने यांनी आजचे शिक्षण दलितांच्या, वंचितांच्या आशा-आकांक्षा पूर्ण न करणारे आणि प्रत्येक जातीत नवा ब्राम्हणीवर्ग कसा निर्माण होत आहे यांचे स्पष्टीकरण केले.

शिक्षणाचे भगवीकरण : राम पुनियानी

राम पुनियानी यांनी शिक्षणाचे भगवीकरण कसे केले जात आहे आणि धर्मनिरपेक्ष तत्वाचा कसा विरोध केला जात आहे यांची मांडणी केली.

बाजारीकरण व जागतिकीकरण : डॉ. सुधीर पानसे

डॉ. पानसे यांनी जागतिकीकरणातून शिक्षणाचे होणारे बाजारीकरण व त्याचे धोके याची चर्चा केली.

शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान : प्रा. जयदेव डोळे

प्रा. डोळे यांनी आधुनिक तंत्रशिक्षणावर मूठभर लोकांची मक्तेदारी कशी निर्माण झाली, याचे स्पष्टीकरण केले.

शिक्षण व समाजपरिवर्तन : डॉ. जनार्दन वाघमारे

डॉ. वाघमारे यांनी शिक्षण समाज परिवर्तनाचे साधन कसे होईल याचे विवेचन केले.