श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

संचालक मंडळ


कॉम्रेड गोविंद पानसरे
अध्यक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्षाजे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व्यक्ती नसून एक विचार आहे, वृत्ती आहे. या समाजात जे चांगलं चालतं ते वाढावं असं त्यांना वाटतं. वाईटाचं समूळ उच्चाटन व्हावं असा त्यांचा आग्रह असतो. विद्यार्थी दशेपासून कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत असणारे कॉ. पानसरे एक कुशल संघटक, समाजशिक्षक तर आहेतच पण त्याहीपक्षा ते मोठे प्रबोधक आणि सुधारक आहेत. पुरोगामी समाज निर्माण व्हावा म्हणून गेली ६० वर्षे ते अव्याहतपणे लढत आहेत. सामान्यांसाठी सतत रस्त्यावर मूठ आवळून उतरणारे ते खरे नेते आहेत. कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळींचे मार्गदर्शक असणारे कॉ. पानसरे हे श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विषयी सविस्तर माहिती
कॉ. आनंदराव परूळेकर
सेक्रेटरी
कॉ. आनंदराव परूळेकर श्रमिक प्रतिष्ठानचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत असून, कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे कोषाध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत माजी संचालकपदही भूषविले आहे.
प्रा. विलास रणसुभे
मुख्य समन्वयक तथा संयोजक
श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक तथा संयोजक असणारे प्रा. रणसुभे कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी अनेकविध पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. तसेच राज्यशास्त्र, मार्क्सवाद, तत्वज्ञान, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत.
श्री. चिंतामणी मगदूम
रत्नाकर बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री. मगदूम यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेल्या अनेक लढ्यांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या कार्यातही त्यांचा नेहमी सहभाग असतो.
कॉ. एस. बी. पाटील
कॉ. एस. बी. पाटील हे ‘आयटक’ कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि राज्य कौन्सिल सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कामगारांच्या अनेक लढ्यांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले असून, कोल्हापूरातील गोकूळ दूध संघातून ‘क्लॉलिटी कंट्रोल मॅनेजर’ पदावरून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत.
प्रा. डॉ. मेघा पानसरे
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मेघा पानसरे या विद्यार्थी दशेपासून पुरोगामी चळवळींत कार्यरत आहेत. सध्या त्या भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधातील प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहणाऱ्या डॉ. पानसरे यांनी महिलांशी संबंधित विषयांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत. तसेच अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन केले असून, यामध्ये रशियन भाषांतराची समावेश आहे.
प्रा. डॉ. मेघा पानसरे यांचे विषयी सविस्तर माहिती
श्री. दिलीप चव्हाण
कोल्हापूरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत शाखाधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. दिलीप चव्हाण कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे नेते आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेल्या अनेक लढ्यांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे.