श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ३ रे नांदेड(२०११)


3 रे राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,नांदेड

नांदेड येथे तिसरे राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन अतिशय उत्साहात पार पडले. परिवर्तनाच्या चळवळीत अण्णा भाऊंना केंदस्थानी आणण्याचे संस्कृतिकारण इथे जाणतेपणी केले गेले.

आपल्या संस्कृतीच्या केंदस्थानी कोण असावे, कोणती प्रमाणकं आपण मानावीत आणि कोणती प्रतिकं स्वीकारावीत ही सांस्कृतिक संघर्षात आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट ठरते. मराठी साहित्य-संस्कृतीने आजवर अव्हेरलेली प्रमाणकं आज केंदस्थानी येत चालली आहेत, या संस्कृतीची मक्तेदारी संपुष्टात येत चालल्याची खूण मानावी काय? नांदेडमध्ये भरलेल्या तिसऱ्या राज्यव्यापी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात ती स्पष्ट दिसली.

आदल्यावषीर् अहमदनगर येथे पार पडलेल्या अण्णाभाऊ साठे संमेलनाच्या उद्घाटनात प्रमुख पाहुणे प्रा. रावसाहेब कसबे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्यावेळची एक आठवण सांगितली होती. प्रा. ना. सी. फडके यांनी कॉ. डांगे यांना आपल्याला कामगारांच्या जीवनावर कादंबरी लिहायची असुन कामगार मोर्चा बघायची इच्छा आहे, तेव्हा एखाद्या गाडीची सोय करा आणि ती गाडी एसी असेल, असं पाहा, असं पत्राने कळवलं होतं. एक मेच्या कामगारदिनी परळ येथून कामगारांचा मोर्चा निघाला तेव्हा फडके वातानुकुलित मोटारगाडीत सिगरेट ओढत बाहेरचा मोर्चा न्याहाळत होते तर बहेरच्या रणरणत्या उन्हात अण्णाभाऊ साठे डफ हाती घेऊन मोर्च्याच्या अग्रभागी चालले होते. आज राज्यात ठिकठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती होते, त्यांच्या साहित्यावर चर्चा झडतात, पण ना. सी. फडके मात्र आज साहित्याच्या नकाशावरून गायब झाले आहेत. साहित्याचे केंद बदलले आहे. ज्यांनी तळागाळातल्या माणसांचं साहित्य रचलं, सर्वसामान्य-गरीब माणसांच्या वेदनांना वाचा फोडली आणि त्यांचं आयुष्य लिखित साहित्याच्या परिघावर आणून सारस्वतांच्या कळपाला छेद देण्याचा गुन्हा केला ते आज संस्कृतीच्या मुख्य धारेत मधोमध आले आहेत. कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाने हा संदेश अधोरेखित केला.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेने हे संमेलन सुरू झालं. पहिल्या वषीर् कोल्हापुरात, दुसऱ्यावषीर् नगरला आणि आता तिसऱ्या वषीर् नांदेडला ते संपन्न होत असताना त्याची मांडणी, आशय आणि आयोजन यांबाबतीत ते अधिकाधिक पक्व होत गेलेलं दिसलं.

संमेलनाच्या उद्घाटनाच्या समारंभात कॉ. पानसरे यांनी त्यामागचा हेतू अत्यंत स्पष्ट शब्दांत विशद केला. अण्णाभाऊ साठेंना परिवर्तनाच्या लढ्यातलं प्रतिक करण्याचा आपला विचार त्यांनी खुलेपणाने बोलून दाखवला. आज प्रत्येक जातीत आपापले आयडॉल उभे राहात आहेत. मातंग समाजाने अण्णाभाऊ साठेंना आपले हीरो मानलं आहे. ते योग्यही आहे. पण ही माणसं जातींच्या कुंपणात बंदिस्त होण्याइतकी लहान नव्हती, त्यांची झेप त्याच्याही पलीकडे होती हे आपण समजून घेतलं पाहिजे, हाही यामागचा एक भाग होता. त्यामुळेच या संमेलनात केवळ दलित, केवळ कम्युनिस्ट वा केवळ कष्टकरी नव्हते तर परिवर्तनाचा विचार मानणारे अनेक समुह यात सामावून गेले होते. त्यामुळे संमेलनाच्या दोन्ही दिवशी शंकरराव चव्हाण नाट्यगृह भरलेलं होतं. अगदी परिसंवादांनाही ते भरलेलं असायचं. सभागृहातली खेडवळ माणसं मंचावरून बोलणाऱ्याचं लक्षपूर्वक ऐकत असायची आणि कधी पटलं नाहीच तर जागेवर उभं राहून बोलायला कमी करायची नाहीत.

आदिवासींच्या चळवळीतील कार्यकतेर् दिनानाथ मनोहर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. मागच्या वषीर्चे अध्यक्ष प्रा. राजन गवस यांनी आवर्जून हजेरी लावली होती. तरुण पिढीत लिहिते हात दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करुन सर्व बाजूंनी संभ्रम उत्पन्न करणाऱ्या या काळात आपलं भान जागतं ठेवण्याची गरज त्यांनी मांडली.

परिसंवादात उत्तम कांबळे, प्रा. दत्ता भगत, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. महेंद भवरे, अर्जुन डांगळे, चंदकांत वानखेडे, भालचंद कांगो, श्रीपाद जोशी असे मान्यवर वक्ते सहभागी झाले होते. अनेक वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचं अत्यंत मामिर्क आणि सखोल विश्लेषण केलं. त्याला उपस्थित श्रोत्यांकडून मिळणारी दाद हे अण्णाभाऊंचं त्यांच्या मनातील स्थान दाखवत होती. 'फकिरा'सारखी कादंबरी, 'माझी मैना गावाकडं राहिली' सारखा कटाव आणि 'जग बदल घालुनि घव' सारखी कवनं लिहिणारे अण्णाभाऊच त्यांना अधिक जवळचे वाटत होते.

शाहिरी जलसे आणि कवी संमेलनाला मिळालेली दाद, प्रचंड उपस्थिती संमेलनाच्या गदीर्चा ददीर्पणा जाणवून देत होती. आयोजनाची शिस्त, साध्यापण रुचकर जेवणाची लज्जत आणि आपलेपणा यामुळे एका शांत, मजेदार लयीत संमेलन पार पडलं. फारुक अहमद, बालाजी थोटवे, प्रदीप नागापूरकर, संजयकुमार मांजरमकर, आदिनाथ इंगोले आदिंच्या संयोजन समितीने हे सुकाणू चांगलं हाकलंच पण त्यांना साथ देणाऱ्या तळगाळातील कार्यर्कत्यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घतल्याचं पदोपदी दिसलं.

समारोपाच्या समारंभात कॉ. गोविंद पानसरे यांनी परिवर्तनाच्या लढाईत 'शत्रू-मित्र विवेक' बाळगण्याचा संदेश दिला. एकाचवेळी सर्वांशी शत्रुत्व ओढवून न घेता त्यातला किमान मतभेदाचा माणूस कोणता, समविचारी कोणता, दूरच्या पल्ल्यात साथ देणारा कोणता आणि कधीच जवळ करू नये असा माणूस कोणता याचं स्पष्ट भान आपणा सर्वांनाच ठेवावं लागेल आणि अंतर्यामी हेतू स्वच्छ ठेवूनच पुढे जावं लागेल, असं सांगितलं. डाव्या विचारांच्या लोकांसाठी निराशामय वाटणाऱ्या सध्याच्या वातावरणात मार्ग काढण्यासाठी कॉ. पानसरेंचा हा विचार तरुण कार्यर्कत्यांना उपयोगी पडेल. निराश होण्यासारखी परिस्थिती मुळीच नाही, कारण आशेचे किरण अनेक ठिकाणी दिसत आहेत, उदाहरणार्थ हेच संमेलन, ज्यात खूप प्रतिकूल परिस्थितीतून आलेली मुलं तडफेनं काम करताना दिसत होती. पानसरेंच्या या वक्तव्याने तरुण आयोजकांचा हुरुप नक्कीच वाढला असेल.

- श्री. चक्रधर पाटील.