श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष १ ले कोल्हापूर (२००८)


१ ले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, कोल्हापूर (दि. १०, ११ मे, २००८)

            अर्जुन डांगळे (संमेलनाध्यक्ष)


उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे म्हणाले, की…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने भरविल्या जाणार्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. या साहित्य संमेलनात सामील होताना मला अतिशय आनंद होत आहे. याचे कारण अण्णा भाऊंसारख्या एका थोर लेखकाच्या सहवासात म्हणण्यापेक्षा आजूबाजूला मला लहानपणी वावरता आले. हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा होय. नुकतेच कालकथित झालेले दिग्गज लेखक बाबूराव बागूल यांचा सहवासही मला बालपणापासून तो शेवटपर्यंत लाभला, हादेखील तितकाच अनमोल ठेवा होय.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाटेगावला अस्पृश्य समजल्या जाणार्या मांग जातीत जन्माला आले. शेती नाही, उत्पादनाचे कसलेही साधन नाही. शिक्षणाची सोय नाही, उपासमार, दारिद्य्र, लाचारी ही दुःखे इथल्या अस्पृश्य समाजाला इथल्या धर्म, समाजव्यवस्थेने बहाल केली होती. ते सारे दुःख, दैन्य आणि वेदना घेऊन अण्णा भाऊ आपल्या वडिलांबरोबर मुंबईला पायी आले. वाटेत कल्याणला कोळसा भरण्याचे काम, नंतर मुंबईत डोकीवर कपड्याचे गाठोडे घेऊन फिरण्याचे काम अशी अनेक कष्टाची कामे त्यांनी केली. मुंबईच्या मोटबाग मिलमध्ये नंतर ते नोकरीला लागले. हा इतिहास सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना माहीत आहे. पुढे अण्णा भाऊ साठे नावाचा तारा मराठीच्या साहित्यक्षेत्रात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात तेजाने चमकत राहिला हेदेखील आपणास ज्ञात आहे.

अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे मूल्यमापन करणारे लिखाण अलीकडे होऊ लागले आहे. पण वाटेगावहून पायी चालत मुंबईत आल्यानंतर कष्टाची कामे करणारे, शिक्षणाची, ज्ञानाची परंपरा नसलेले अण्णा भाऊ मराठीतील प्रतिभावंत शाहीर, लेखक म्हणून प्रसिद्धीला आले. ते कम्युनिस्ट चळवळीकडे कसे आकर्षित झाले, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे मला वाटते........

अर्जुन डांगळे (संमेलनाध्यक्ष) यांचे संपूर्ण भाषण साठी येथे क्लिक करा