श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

श्रमिक प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम


कॉ. अविनाश पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त

श्रमिक प्रतिष्ठान व प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनतर्फे:

कोल्हापूरात लघुपट महोत्सव

चित्रपट - लघुपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे, या विचाराने श्रमिक प्रतिष्ठान व प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनच्यावतीने कॉम्रेड ॲड. अविनाश पानसरे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येते.

यंदाही कॉम्रेड ॲड. अविनाश पानसरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दि. २ ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता कोल्हापूरातील करवीर नगर वाचन मंदिरात लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हिंदीसह तुर्की भाषेतील ५ लघुपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवात आपणही सहभागी व्हावे, हे आग्रहाचे निमंत्रण.

आपले,

प्रा. विलास रणसुभे, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.

ॲड. मिलिंद कदम, प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशन, कोल्हापूर.