श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष ५ वे सन २००६)
भारताचे बदलते राजकारण

जागतिकीकरणामुळे शिक्षण हा विषय मूठभर लोकांचा व गुंतागुंतीचा झालेला आहे. शिक्षण हा विषय शिक्षक व विद्यार्थी यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पालक, समाज व अर्थव्यवस्थेशी निगडीत बनलेला आहे. आज तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मानवी जीवनाचे सर्व प्रश्न सोडवू शकते, मानव्यशास्त्राची गरज नाही असे मत मांडले जात आहे. तंत्रशिक्षणामुळे मानवाची भौतिक प्रगती होऊ शकते. परंतु मानवाच्या सामाजिक जाणीवांची, मनाची, वर्तनाची, नीतीमत्तेची प्रगती होत नाही. त्यासाठी कला, क्रीडा, सामाजिक शास्त्राच्या शिक्षणाची गरज असते. या गोष्टीकडे भांडवली व्यवस्था दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच आजची शिक्षण व्यवस्था, त्याची सद्यस्थिती, जागतिकीकरणाचे त्याच्यावर झालेले परिणाम आदी विषयांची चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने शिक्षण या विषयावर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.
सन १९८० पासून भारतीय राजकारणात जलदगतीने होणाऱ्या अंतर्बाह्य बदलाची कारणे शोधण्याच्या मुख्य हेतूने हा मुख्य विषय निश्चित करण्यात आला. भारतातील राजकीय बदल ही काही बंदिस्त संकल्पना नाही; मात्र १९८० नंतरच्या भारतीय राजकारणात जी स्थित्यंतरे घडली व घडत आहेत, राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत, राज्यघटना दुरूस्तीसारख्या घटना होत आहेत; इत्यादी घटना हेच स्पष्ट करीत आहेत, की भारतामध्ये राजकीय बदल होत आहेत. अशा बदलांची व्यापकता लक्षात घेतल्याशिवाय बदला कशाला म्हणावयाचे हे निश्चित करता येणार नाही. सगळेच राजकीय बदल एकसारखे नसतात. यासाठी अशा बदलांची विविध रूपे विचारात घेऊन त्यांचे स्पष्टीकरण करता येईल का ते पाहणे अत्यावश्यक ठरते. हाच मुख्य हेतू ‘भारताचे बदलते राजकारण’ हा विषय निवडीमागील आहे.

ग्रंथाचे नाव : भारताचे बदलते राजकारण
संपादक : प्रा. विलास रणसुभे
प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई
मूल्य : रूपये १५० फक्त

------------------------ ----------------------------------------------


भारतील राजकारणाचे बदलते स्वरूप : भाई वैद्य

भाई वैद्य यांनी आपल्या मांडणीत जात, धर्म, भाषा, प्रादेशिकता व जागतिकीकरण याचा ऊहापोह करून त्यातून निर्माण होणारे प्रश्न व निरनिराळ्या राजकीय पक्षांचे दृष्टीकोन याविषयीची सैद्धांतिक मांडणी केली.

संसदीय पद्धतीची उपयुक्तता व मर्यादा : प्रकाश बाळ

श्री. प्रकाश बाळ यांनी संसदीय पद्धतीची उपयुक्तता व मर्यादा स्पष्ट करून असे सांगितले, की संसद ही राजकीय, आर्थिक व सामाजिक बदलांबाबत कितीतरी मोठ्या प्रमाणावर कार्य करू शकते. मात्र त्यासाठी न्याय व्यवस्था, राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि प्रसारमाध्यमांची साथ लाभण्याची आवश्यकता असते.

राजकीय व सामाजिक चळवळी : डॉ. राजेंद्र व्होरा

डॉ. व्होरा यांनी राजकीय व सामाजिक चळवळींच्या बदलत्या स्वरूपाची सैद्धांतिक मांडणी अत्यंत प्रभावीपणे करू आक्रमक अहिंसावादाचे समर्थन केले. आक्रमक अहिंसा या मार्गाचा अवलंब केल्यास राजकीय बदल घडवून आणता येतात. आज मूलभूत, सामाजिक व आर्थिक चळवळींचे सातत्य नसल्याने खैरलांजीसारख्या घटना घडल्या की उद्रेक होतो; पण नंतर पुन्हा सामाजिक विषमतेची चर्चासुद्धा होत नाही. यामुळे समाजात मूलभूत असे बदल केव्हा होणार, असे प्रश्न समाजातून विचारले जातात.

जात, वर्ग व सामाजिक न्याय : डॉ. सुहास पळशीकर

लक्ष्मण माने यांनी आजचे शिक्षण दलितांच्या, वंचितांच्या आशा-आकांक्षा पूर्ण न करणारे आणि प्रत्येक जातीत नवा ब्राम्हणीवर्ग कसा निर्माण होत आहे यांचे स्पष्टीकरण केले.


राजकारणातील स्त्रियांचा सहभाग : राही भिडे

श्रीमती भिडे यांनी राजकारणातील स्त्रियांचा सहभाग व त्याव्दारे स्थानिक स्वराज्य संस्थेत होणारे बदल स्पष्ट केले. विधानसभा व लोकसभेमध्ये जर स्त्रियांचा सहभाग वाढला तर त्याव्दारे कोणते बदल होऊ शकतील, याची सांगोपांग चर्चा केली. सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग असल्याशिवाय राजकीय बदलाची भूमिका पार पाडता येणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

जागतिकीकरणाचा भारतीय राजकारणावर परिणाम : दत्ता देसाई

अमेरिकन साम्राज्यवाद व तेल उत्पादनावर वर्चस्व मिळविण्यासाठी झालेली युध्दे यांसारख्या घटनांचा भारतीय राजकारणावर कशाप्रकारे परिणाम होत गेला, याची दत्ता देसाई यांनी आपल्या व्याख्यानात सोदाहरण मांडणी केली. अशा परिणांमातून मुक्त होण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत, तेही स्पष्ट केले. तसेच या घटनांचे राजकारणातील बदलावर होणारे परिणाम विशद केले.

भारतीय राजकारणातील पेचप्रसंग : कुमार केतकर

श्री. केतकर यांनी आपल्या व्याख्यानात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, भारतातील जातीयवादी पक्ष, डावे पक्ष, त्यांच्या कार्यपध्दती, तसेच भारतीय राजकारणातील धर्म, भाषा, संस्कृती यांची चर्चा केली.